कुटुंबव्यवस्था - लेख सूची

कुटुंब-व्यवस्था — मुलांना वाढविणे (भाग १)

१.कुटुंबाच्या दोनतीन व्याख्या करणे शक्य आहे. विकेंद्रित समाजव्यवस्थेतील सर्वांत लहान स्वायत्त घटक अशी एक काहीशी राजकीय-व्यवस्थापकीय-व्यावहारिक जगातील व्याख्या होऊ शकेल. विशाल समाजपुरुषाची ती एक छोटीशी घटकपेशी आहे अशी पण व्याख्या होऊ शकते. कुटुंबाची जैविक व्याख्या पण होऊ शकते – नर मादी-पिले अशी. मानववंशसाखळी ही अखंड, अतूट असली तरी व्यक्ती, कुटुंबे ह्या त्यातल्या सुट्या सुट्या कड्या …

कुटुंब-व्यवस्था – मुलांना वाढविणे (भाग २)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर …